#isro
३० ऑक्टोबरला इस्रोचं नवं नेव्हिगेशन उपग्रह एनव्हीएस-०३ प्रक्षेपित होणार
इस्रो ३० ऑक्टोबरला जीएसएलव्ही मार्क-२ यानातून एनव्हीएस-०३ हा नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण होणार आहे. या उपग्रहामुळे सुमारे १२,००० रेल्वेगाड्यांचं रिअल-टाइम ट्रॅकिंग करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला बळ मिळेल.
पुढील पिढीचे हेवी लिफ्ट यान, चांद्रयान 4-5; इस्रोचा आराखडा ESTIC 2026 मध्ये मांडणार
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्या माहितीनुसार, 27 ते 29 ऑक्टोबरला नवी दिल्लीत होणाऱ्या ESTIC 2026 मध्ये 30,000 किलोपेक्षा जास्त वजनाचा भार कक्षेत नेण्यास सक्षम पुढील पिढीच्या हेवी लिफ्ट यानाचे प्रतिरूप तसेच चांद्रयान 4 व 5 प्रकल्प प्रदर्शित होणार आहेत.