मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत कथित फेरफार झाल्याचा आरोप करत राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यासह १३ विरोधी नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग न्यूजअमेरिकेचे नागरिकत्व असलेले बॉलिवूड अभिनेते इम्रान खान ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलनात सहभागी झाल्याने वाद निर्माण झाला आहे. परदेशी नागरिकाला भारतात आंदोलनाचा अधिकार आहे का, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत ऐतिहासिक विजयाची पताका फडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कुशल संघटनात्मक नेतृत्वाखाली आज पुणे शहर भाजपची अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.
ब्रेकिंग न्यूजपावसाच्या तुटीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारने पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प दाखवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील आणि शेतकरी-केंद्रित प्रशासकीय दृष्टिकोनातून प्रेरणा घेत, देगलूर-बिलोली मतदारसंघाचे भाजप आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपला एक महिन्याचा पगार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विजयासाठी महायुतीची मोठी रणनीती; आ. सुधीर मुनगंटीवार यांची 'महायुती निवडणूक समन्वयक'पदी नियुक्ती
ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, गुणांमधील तफावत, निवड प्रक्रियेतील अनियमितता तसेच पेपरफुटी प्रकरण या मुद्द्यांवर आंदोलन करत प्रमुख १२ मागण्या मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व परीक्षार्थी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.