मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
ब्रेकिंग न्यूजराजकारण

भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय पदाधिकारी जाहीर, सायली कुलकर्णी सचिव

भाजपने युवा मोर्चाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. सात उपाध्यक्ष आणि तीन सरचिटणीस नेमले असून मुंबई महापालिकेच्या नगरसेविका सायली रघुनाथ कुलकर्णी यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली आहे.

· · १ मिनिटाचे वाचन
भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय पदाधिकारी जाहीर, सायली कुलकर्णी सचिव

मुंबई : भारतीय जनता पार्टीने (भाजप) युवा मोर्चाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (२० ऑक्टोबर) घोषणा केली. भाजपने सात जणांना राष्ट्रीय उपाध्यक्ष तर तिघांना राष्ट्रीय सरचिटणीस केले.

मुंबई महापालिकेच्या नगरसेविका सायली रघुनाथ कुलकर्णी यांच्यासह सात जणांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि वडोदरा येथील खासदार हेमांग जोशी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या निर्देशानुसार या नियुक्त्या केल्या असून त्या तातडीने लागू होतील, असे जोशी यांनी सांगितले. बिहारचे हिमांशू यादव यांच्याकडे राष्ट्रीय माध्यमप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. दिल्लीच्या अपूर्वा सिंह यांच्याकडे सोशल मीडिया प्रमुखपद तर बिहारच्या मानवेंद्र चौहान यांच्याकडे सहप्रमुखपद सोपवले आहे.

युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर विविध राज्यांतील ३४ सदस्यांची नियुक्ती केली आहे.