#vipin-itankar
५५ कोटींची मंजुरी, हातात फक्त २४ कोटी; नागपूरचे नगरसेवक आयुक्तांच्या दारात
नागपूर महानगरपालिकेत सत्ताधारी पक्षाचे सुमारे १०० नगरसेवक आयुक्त कार्यालयात जाऊन अडकलेल्या विकासकामांचा आढावा मागत आहेत. झोनल बजेट मंजूर होऊनही निधी न मिळाल्याची तक्रार आहे. दुर्बल घटक समितीकडे ३५ कोटींची तरतूद, पण ५५ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी. ९० हून अधिक नगरसेवकांना अपेक्षित निधी मिळालेला नाही.
जागतिक बँकेच्या खर्चाने महापौर आणि आयुक्त सोलला; नागपूरच्या पाणीपुरवठ्याचा धडा कोरियातून
नागपूरच्या महापौर नीता ठाकरे आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर सोमवारपासून दक्षिण कोरियातील सोल आणि देजॉन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाणी व्यवस्थापन परिषदेला जात आहेत. जागतिक बँकेने महाराष्ट्रातून तीन प्रतिनिधी निवडले असून परिषदेचा संपूर्ण खर्च बँक करणार आहे.