#solapur
ऊसदरासाठी स्वाभिमानीचा सोलापुरात मोर्चा, धाराशिवमध्ये चक्का जाम; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
ऊसाला 3,800 रुपये दर आणि पहिली उचल 3,500 रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी सोलापुरात मोर्चा काढला आहे. संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सकाळी 11 वाजता चार हुतात्मा चौक ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. धाराशिवमध्ये दुपारी 12 वाजता येडशी टोलनाक्यावर चक्का जाम होणार आहे.
विहिरीतील तिसरा मृतदेह बाहेर; चौकशी समिती आणि ब्लास्टिंगचा शोध
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहिरीचा ढिगारा कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तिसरा मृतदेह सोमवारी सकाळी बाहेर काढण्यात आला. चौथ्या मजुराचा शोध सुरू असून या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे.