#food-safety
१८ हॉटेलांचे परवाने रद्द; खाऊ गल्लीपासून कुलाब्यापर्यंत कारवाई, १.२७ कोटींचा माल जप्त
अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी राज्य अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील नऊ, ठाण्यातील तीन आणि पुण्यातील सहा आस्थापनांचे परवाने स्थगित केले अथवा व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. राज्यभरात १.२७ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
स्वामींच्या दरबारात प्रसादाच्या नावाखाली भेसळ? ८५० किलो मिठाई जप्त, चार दुकानांना टाळे
अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत २ लाख ५० हजार २० रुपये किमतीचा ८५० किलो मिठाईचा साठा जप्त केला. चार आस्थापनांना व्यवसाय बंदचे आदेश, मुख्य पुरवठादाराचा परवाना निलंबित.
ग्राहकांना दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवरून एफएसएसएआयच्या नेस्ले इंडिया व झायडस वेलनेसला नोटिसा
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नेस्ले इंडिया आणि झायडस वेलनेस या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांवरील दिशाभूल करणाऱ्या दाव्यांबाबत नोटिसा बजावल्या आहेत. अनुपालन न करणाऱ्या जाहिरातींवरही प्राधिकरणाने लक्ष दिले आहे.