#cooperative-election
जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; काकी-पुतण्याच्या लढतीत अरविंद विजयी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ जागांपैकी १४ जागा काँग्रेससमर्थित सहकार पॅनलने आणि ५ जागा भाजप-महायुतीच्या परिवर्तन पॅनलने जिंकल्या. निलंगा येथे अरविंद पाटील निलंगेकर यांनी आपल्या काकी संगीता पाटील निलंगेकर यांचा पराभव केला.
१६ विरुद्ध १३ ने गोकुळ महायुतीच्या हाती; सरकार नियुक्त संचालकांची मतपत्रिका सीलबंद
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजेश पाटील १६ विरुद्ध १३ मतांनी विजयी. सरकार नियुक्त चार संचालकांची मतेच निर्णायक ठरली. हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांची मतपत्रिका वेगळ्या सीलबंद पेटीत ठेवली. अध्यादेशाच्या वैधतेवर २५ नोव्हेंबरला सुनावणी.