ब्रेकिंग न्यूज़पालघरमधील सूर्या प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या हनुमाननगर व चंद्रनगरच्या नागरिकांचा ५० वर्षांचा संघर्ष संपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकारातून जमिनीच्या मालकी हक्काचा ऐतिहासिक शासन निर्णय सुपूर्द.
ब्रेकिंग न्यूज़पायांत पडलेले फोड विसरून टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन होणारी लाखो पावले, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या नामघोषाने दुमदुमणाऱ्या वाटा आणि जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ प्रेमाचे अधिष्ठान जपणारा वारकरी संप्रदाय... महाराष्ट्राचा हा शतकानुशतके वाहणारा भक्तीचा अलौकिक प्रवाह आता थेट जगाच्या नकाशावर मानाने झळकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत संवेदनशील, दूरदर्शी आणि आग्रही पुढाकारातून साकारलेल्या ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ (Pandharpur Wari – In the Footsteps of the Saints) या इंग्रजी माहितीपटाने प्रतिष्ठेच्या ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’ (Asian Academy Creative Awards 2026) मध्ये भारताचा ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ (National Winner) म्हणून ऐतिहासिक बहुमान पटकावला आहे.
ब्रेकिंग न्यूज़वर्षानुवर्षे कोरड्या पडणाऱ्या जमिनी, पाण्यासाठी मैलोन्मैल भटकणाऱ्या मायमाऊल्या आणि आकाशाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा... महाराष्ट्राच्या नशिबी आलेला हा दुष्काळाचा शाप आता कायमचा पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

आज जिथे घराघरांत लहान मुलांचे निरागस बालपण मोबाईलच्या निळ्या प्रकाशात, टीव्हीच्या पडद्यावर आणि चार भिंतींच्या मर्यादित चौकटीत हरवून चालले आहे, तिथे महाराष्ट्राच्या पावन भूमीत एका विलक्षण आणि डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या प्रवासाने जन्म घेतला आहे! वयाच्या अवघ्या साडेसात वर्षांत, जेव्हा मुले खेळण्यांच्या दुनियेत रमतात, तेव्हा डोंबिवलीत राहणाऱ्या प्रेशा आणि रेशवी या जुळ्या लेकींनी सह्याद्रीच्या रौद्र कड्यांवर, कठीण वाटांवर छत्रपती शिवरायांचा जयघोष करत तब्बल २०० गडकिल्ल्यांना प्रेमाने आलिंगन दिले आहे!