राजकारणमहाराष्ट्र
वार्डांसाठी एक रुपयाही नाही, १९९६ च्या वादात ३ कोटी — कोल्हापुरात सभागृह बहिष्काराने तहकूब
नव्या सभागृहाला नऊ महिने उलटली, तरी वार्डांतील विकासकामांसाठी निधी मिळालेला नाही, या तक्रारीवरून सोमवारी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकत्र बहिष्कार केला आणि कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब झाली.
प्रशासनाने फेअरडील कंपनीला जवळपास ३ कोटी रुपये दिल्याच्या निर्णयावरून वाद चिघळला. ८ ऑक्टोबरला न्यायालयाने व्याजासह २४ कोटी रुपये देण्याचा आदेश दिला होता.
रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि उद्यानांची कामे निधीअभावी थांबल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
· १ दिवसापूर्वी