#uapa
जेईएम संपर्काच्या आरोपी विद्यार्थ्याचा डीफॉल्ट जामीन अर्ज फेटाळला
गोवंडी येथील २२ वर्षांच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा डीफॉल्ट जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. प्रतिबंधित जैश-ए-मोहम्मदशी संबंध आणि संस्थापक मसूद अझहर यांचा व्हिडीओ पसरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर. नवंदर यांनी हा अर्ज फेटाळला.
दहशतवादी निधीच्या तपासात काश्मीरमध्ये ईडीचे १३ ठिकाणी छापे
दहशतवादाला निधीपुरवठा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी श्रीनगर आणि बारामुल्ला येथे १३ ठिकाणी छापे टाकले. कार्यकर्त्या खुर्रम परवेझ आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांच्या नातेवाइकांच्या व सहकाऱ्यांच्या निवासस्थानांचा यात समावेश आहे. या प्रकरणात ईडीने यापूर्वी २१ कोटींहून अधिक मूल्याची मालमत्ता जप्त केली आहे.