टॅग
नांदेड जिल्ह्यातील सर्व १६ तालुके एका वर्षासाठी पाणीटंचाई क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घोषित केली आहेत. ६० मीटरपेक्षा खोल विहिरी व बोअरवेलवर बंदी आहे. विष्णुपुरी धरणातील पाणी रब्बी हंगामात सिंचनाला न देता ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय झाला आहे.