#nsdl
एआय शेअर्समधून पैसा बाहेर, भारताकडे वळला; एका आठवड्यात परदेशी गुंतवणूक 38,971 कोटी
जागतिक पातळीवर एआय कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण सुरू असताना परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवल बाजारात एका आठवड्यात 38,971 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार एकूण खरेदी 1.42 लाख कोटींची होती.
2020 मध्ये रद्द केलेले ₹8,415 कोटींचे बाँड बहाल करण्यासाठी येस बँकेला तीन कामकाजाचे दिवस
मार्च 2020 मध्ये रद्द केलेल्या ₹8,415 कोटींच्या अतिरिक्त टियर-1 बाँड्स परत बहाल करण्यास सांगत अॅक्सिस ट्रस्टीशिपने येस बँकेला नोटिस दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा रद्दबातल आदेश कायम ठेवल्यानंतर ही नोटिस आली. तीन कामकाजाचे दिवस देऊन थकीत व्याजावर स्पष्टीकरण मागितलं आहे. 16 नोव्हेंबरला बाँडधारकांची बैठक बोलावली आहे.