#nmc
तिजोरीवर दबाव; महापालिकेचे खर्च कपातीचे आदेश, नव्या प्रकल्पांना स्थगिती
नागपूर महापालिकेने ६,२०० कोटींच्या वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये केवळ २,४०० कोटींहून अधिक वसुली केली आहे. त्यामुळे सर्व विभागांना खर्च कपात, न वापरलेला निधी परत आणि नवे प्रकल्प स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वैद्यकीय शिक्षण नियम रद्द केले, पण मानके कायम : एनएमसीचे स्पष्टीकरण
वैद्यकीय शिक्षणाची मानके राखण्यासंबंधीचे 2023 चे नियम रद्द केल्याने मानकांत ढिलाई होणार नाही, असे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) स्पष्ट केले आहे. वार्षिक माहिती अहवाल अनिवार्य राहतील आणि निरीक्षणाचे अधिकारही कायम राहतील, असे आयोगाने सांगितले.