#mumbai-air-pollution
३३२ आगी, ३ वाजेपर्यंत आवाज; फटाके विक्रीवरच बंदी लागू शकते, उच्च न्यायालयाचा इशारा
मुंबई उच्च न्यायालयाने दिवाळीत शहरात ३३२ आगी लागल्याची आणि प्रदूषणाची नोंद घेतली आहे. सामुदायिक प्रदर्शनांशिवाय सर्व फटाक्यांवर संपूर्ण बंदी घालण्याचा विचार न्यायालयाने व्यक्त केला. आदेश राखीव ठेवण्यात आला असून मुंबई व ठाणे महापालिका क्षेत्रांतील उल्लंघनाचा निषेध नोंदवला गेला.
ब्रेकिंग न्यूजमुंबईच्या धुळीवर व्हॅक्यूम क्लिनिंगचा मारा, मलबा ट्रक झाकणं बंधनकारक
मुंबई महानगर प्रदेशातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वच्छ हवा कृती कार्यक्रम जाहीर केला. रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनिंग यंत्रं वापरणं आणि मलबा वाहणाऱ्या वाहनांना पूर्ण झाकणं बंधनकारक करण्यात येणार आहे. या बाबतच्या मार्गदर्शक सूचना पुढील १५ ते २० दिवसांत तयार होतील.
