टॅग
घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेल्या फुलंब्री पोलिसांच्या पथकावर चौघांनी हल्ला केला. ११ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजून ३० मिनिटांनी मिसारवाडीतील अण्णाभाऊ साठे चौकाजवळ ही घटना घडली. कर्मचारी सुनील सोनवणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.