टॅग
बंगालच्या उपसागरातील अर्नाब चक्रीवादळ 27 रोजी अतिशय तीव्र चक्रीवादळ होणार असून 28 ऑक्टोबरच्या सकाळी बापटला ते विशाखापट्टणमदरम्यान किनाऱ्यावर धडकेल, असे हवामान विभागाने सांगितले. आंध्र प्रदेशने 5.7 लाख संवेदनशील नागरिकांची नोंद केली असून सोमवारी संध्याकाळपासून स्थलांतर सुरू होणार आहे. ओडिशात पाच जिल्ह्यांत शाळा-महाविद्यालये बंद.