टॅग
श्रीनगरचे खासदार आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांनी मंगळवारी लोकसभेचा राजीनामा दिला आणि नॅशनल कॉन्फरन्सही सोडली. जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाच्या पुनर्स्थापनेसाठी लढण्याचे दिलेले वचन पक्षाने मोडल्याचा आरोप त्यांनी केला. बडगाममधील सभेत त्यांनी ही घोषणा केली. भाजपने मात्र पक्षाच्या अंतर्गत वादात आपला कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले.