टॅग
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकृत खाते असल्याचा भास निर्माण करणारे बनावट इन्स्टाग्राम खाते नाशिक शहर सायबर पोलिसांच्या सायबर पेट्रोलिंगमध्ये उघडकीस आले. 'official.kumbhnagari_nashik' या नावाने चालवल्या जाणाऱ्या खात्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २०४ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(क) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.