टॅग
पिलीभीत विधानसभा मतदारसंघातील 10,470 मतदार नोंदींमध्ये अनियमितता आढळल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांवर कारवाईचे तसेच एका संगणक सहाय्यकाच्या हकालपट्टीचे आदेश दिले आहेत. काही मतदारांचे ईपीआयसी क्रमांक शोधल्यास इतर मतदारांची माहिती दिसत होती.