टॅग
टोरेस दागिने घोटाळ्यातील आरोपी युक्रेनचा नागरिक ओलेक्झांडर झापिचेंको (38) याला रोमानियातून भारतात आणण्यात आले असून त्याच्यावर मुंबईत खटला चालेल. ईडीने त्याचे नाव 12 जणांसह आरोपपत्रात नमूद केले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनुसार दादरच्या प्रमुख शोरूमने एकट्याने 15,018 गुंतवणूकदारांची ₹149.66 कोटींची फसवणूक केली.