#donald-tusk
2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे भारत-पोलंडचे लक्ष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे तसेच भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार लवकरात लवकर अमलात आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. संरक्षण, अंतराळ, अणुऊर्जा व कृत्रिम बुद्धिमत्तेत सहकार्य वाढवण्यावरही सहमती झाली.
व्यापार, संरक्षण व अंतराळ सहकार्यावर मोदी-टस्क चर्चा
पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. 16 वर्षांतील पोलंडच्या पंतप्रधानांची पहिली भारत भेट. टस्क बंगळुरूलाही भेट देणार.
ड्रोनपासून अणुऊर्जेपर्यंत: टस्क यांनी मोदींना म्हटलं मित्र, संरक्षण-अवकाश-अणुक्षेत्रात वाढणार सहकार्य
हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यात बैठक झाली. संरक्षण, अवकाश आणि अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देश सहमत झाले. पोलंडच्या कंपन्यांना संयुक्त संशोधन व उत्पादनासाठी मोदींनी आमंत्रण दिलं.
राजघाटावर श्रद्धांजली; पोलंडचे पंतप्रधान टस्क यांचा भारत दौरा
पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी गुरुवारी नवी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार, संरक्षण आणि रशिया-युक्रेन संघर्ष हे प्रमुख मुद्दे असतील.