#deepfake
बच्चन आणि सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडीओंचा वापर; भुवनेश्वरमध्ये ३० लाखांची फसवणूक
अमिताभ बच्चन आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बनावट व्हिडीओंच्या आधारे गुंतवणूक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतून तिघांना अटक केली. भुवनेश्वरमधील ५९ वर्षांच्या नागरिकाची सुमारे ३० लाख रुपयांची फसवणूक झाली.
डीपफेक व्हिडीओची धमकी; आमदाराकडून 5 कोटींची मागणी, सहा जण ताब्यात
विधान परिषद सदस्य मिर्झा रहमत बेग यांना डीपफेक व्हिडीओ आणि छायाचित्रे पसरवण्याची धमकी देऊन 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. नरसिंगी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून 4.7 लाख रुपये रोख जप्त केले आहेत.
लावरोव्हचा खोटा व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांच्याविरुद्ध गुन्हा
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांचा कृत्रिमरीत्या तयार केलेला व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ज्येष्ठ सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रशांत भूषण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओत भारताबाबत टीका असल्याचे दाखवले होते. परराष्ट्र मंत्रालयाने तो बनावट असल्याचे आधीच स्पष्ट केले होते.