#crpf
दोन विशेष पोलीस अधिकारी गोळीबारात ठार; शस्त्रे बेपत्ता
किश्तवाड जिल्ह्यात बुधवारपासून बेपत्ता असलेल्या दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे मृतदेह गोळ्या झाडलेल्या अवस्थेत सापडले आहेत. त्यांची शस्त्रे सापडलेली नाहीत. याच दिवशी कुलगाममध्ये सुरक्षा तपासणी नाक्यावर झालेल्या गोळीबारात तीन सीआरपीएफ जवान जखमी झाले.
निदर्शनानंतर पोलीस अधिकाऱ्याला निलंबित; पाच मागण्यांवर ठाम भूमिका
दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर झालेल्या निदर्शनानंतर सहायक पोलीस आयुक्त मानस्वी वशिष्ठ यांना निलंबित केले आहे. वरिष्ठांना चुकीची माहिती देणे, अधीनस्थांना निदर्शनास प्रवृत्त करणे आणि सोशल मीडियावर वरिष्ठांविरुद्ध पोस्ट करणे अशी कारणे चौकशीत निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.
ईडीच्या दोन अधिकाऱ्यांना सीबीआयने ताब्यात घेतले; 5 लाखांची लाच घेतल्याचा आरोप
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) लखनऊ कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना बँक फसवणूक प्रकरणात 5 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून सीबीआयने ताब्यात घेतले आहे. सीआरपीएफवरून नियुक्तीवर असलेल्या हेड कॉन्स्टेबलला सापळा रचून पकडण्यात आले.