#chandrashekhar-bawankule
पवना धरणाच्या विस्थापितांना ५३ वर्षांनी जमिनीचा फॉर्म्युला; १५ दिवसांत प्रक्रिया सुरू
१९७३ च्या शासन निर्णयावर आधारित जमीन वाटपाचा फॉर्म्युला राज्य सरकारने जाहीर केला. दोन एकरपर्यंतची जमीन तशीच; दोन ते चार एकरपर्यंत प्रत्यक्ष ताब्यातील जमीन; चार एकरांपुढे कमाल चार एकर. मावळातील ७६४ कुटुंबे प्रतीक्षेत.
दुष्काळी तालुके ३१० वर; बांधकामांना स्थगिती, पाणीटंचाईसाठी निधी वळवला
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंग्लज हे दोन तालुके दुष्काळी घोषित झाल्याने राज्यातील एकूण दुष्काळी तालुक्यांची संख्या 310 झाली आहे. 358 पैकी 86.59 टक्के तालुके दुष्काळी आहेत. जिल्हा प्रशासनांना दुष्काळी तालुक्यांतील अनावश्यक नवीन बांधकामे थांबवून निधी पिण्याच्या पाण्याकडे वळवण्याचे आदेश दिले आहेत.
दुष्काळाची व्याप्ती वाढली; ३५८ पैकी ३०८ तालुके दुष्काळग्रस्त, ९४.३ लाख शेतकऱ्यांना ४,७०१ कोटी
कोकणातील चिपळूण, वाडा, विक्रमगड आणि नाशिकच्या दिंडोरीसह चार तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले. राज्यातील एकूण संख्या ३०८ झाली आहे. आतापर्यंत ९४.३ लाख शेतकऱ्यांना ४,७०१.६ कोटी रुपये वितरित झाले आहेत.
ब्रेकिंग न्यूजपाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा, टँकर हा शेवटचा पर्याय ठेवा: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
वीजबिल थकबाकी किंवा ट्रान्सफॉर्मरअभावी बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू कराव्यात आणि टँकर हा शेवटचा पर्याय ठेवावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. दुष्काळी भागातील चारा नियोजनाचा आढावाही बैठकीत घेण्यात आला.
