#astana
उपांत्य फेरीत 10-0; मनीषा भनवाला आज जागतिक कुस्तीच्या सुवर्णपदकासाठी
अस्ताना येथील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 59 किलो उपांत्य फेरीत मनीषा भनवाला यांनी यजमान कझाकिस्तानच्या अल्टिन शागायेवा यांचा 10-0 ने पाडून पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आज सुवर्णपदकासाठी त्यांची लढत अमेरिकेच्या ॲबिगेल नेट यांच्याशी होईल. सुजीत कलकल उपांत्यपूर्व फेरीत बाद.
अखेरच्या क्षणी हुकले सुवर्ण; नीलम आणि काजलची जागतिक कुस्तीत रौप्य पदके
अस्ताना येथील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या नीलम सिरोही आणि काजल ढोचक यांनी रौप्य पदके जिंकली. एकाच जागतिक स्पर्धेत दोन भारतीय महिला अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. 50 किलो गटात नीलम यांना जपानच्या युई सुसाकी यांनी, तर 76 किलो गटात काजल यांना युक्रेनच्या अनास्तासिया अल्पीयेवा यांनी पराभूत केले.