टॅग
हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत शुक्रवारी पाकिस्तानने भारताची 88/5 ही धावसंख्या केवळ 3.5 षटकांत पूर्ण करत चार गडी राखून विजय मिळवला. पहिल्याच षटकात ख्वाजा नफे याने कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर सलग पाच षटकार मारले. शशांक सिंहची 11 चेंडूंतली 40 धावांची खेळी हीच भारताचा आधार ठरली. आता भारताला यूएईला हरवून नेट रन रेट सुधारावा लागणार आहे.