#zubeen-garg
638 हेक्टरहून अधिक जमिनीवरील अतिक्रमण हटवले; मुख्यमंत्र्यांचा दावा
असामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी तीन जिल्ह्यांतील 638 हेक्टरहून अधिक जमिनीवरील अतिक्रमण गेल्या काही दिवसांत हटवल्याचे सांगितले. राज्याचे हित राखण्यासाठी सरकार काम करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूच्या न्यायासाठी शंभरहून अधिक लोकांनी मानवी साखळी केली.
जुबीन गर्ग प्रकरण: दिसपूरमध्ये राइजोर दलाच्या नेत्यांसह १५० हून अधिक जण ताब्यात
गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूची पारदर्शक चौकशीच्या मागणीसाठी दिसपूरमधील आसाम सचिवालयाबाहेर मानवी साखळी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी तोडला. त्यात राइजोर दल व केएमएसएसच्या नेत्यांसह १५० हून अधिक जण ताब्यात घेतले गेले. जामीन आदेशांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार, असे सरकारने सांगितले.