गुन्हेगारीमहाराष्ट्र
जीएसटीसाठी 73 लाख पाठवले, जमा झाले 14 लाख; ठाण्यात सल्लागाराविरुद्ध गुन्हा
ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांनी कर सल्लागाराविरुद्ध 74 वर्षांच्या व्यावसायिकाची जीएसटी भरण्याच्या बहाण्याने 59.81 लाख रुपयांची कथित फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार एप्रिल 2020 ते सप्टेंबर 2025 दरम्यान कंपनीने सल्लागाराला 73,37,488 रुपये पाठवले, त्यापैकी केवळ 13,97,856 रुपये जीएसटी पोर्टलवर जमा झाले.
तफावत झाकण्यासाठी सल्लागाराने बनावट चलने व पावत्या दिल्याचा आरोप आहे.
· ५ तासांपूर्वी