#swiggy
स्विगीचे तिमाही नुकसान ९२२ कोटींवर, महसूल ५४ टक्क्यांनी वाढला
स्विगीचे दुसऱ्या तिमाहीतील निव्वळ नुकसान ९२२ कोटी रुपयांवर आले, जे गेल्या वर्षी १,०९२ कोटी होते. महसूल ५४.४ टक्क्यांनी वाढून ५,५६१ कोटी रुपयांवर गेला. क्विक कॉमर्सचा महसूल ३३.३ टक्क्यांनी तर फूड डिलिव्हरीचा २१.६ टक्क्यांनी वाढला.
कच्च्या तेलाचा दणका : सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला, निफ्टी 22,500 खाली
पश्चिम आशियातील तणावामुळे ब्रेंट कच्चे तेल 113-114 डॉलरच्या पाच महिन्यांतील उच्चांकावर गेल्याने शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स 450 अंकांनी तर निफ्टी 22,500 खाली आला. मात्र आयटी शेअर्सनी तेजी दाखवली.