टॅग
गुमला जिल्ह्यातील समसेरा गावात दोन महिलांची कुऱ्हाडीने हत्या केल्याचा आरोप चौघांवर आहे. मृत महिला मिनी प्रिया (28) आणि राधिका कुमारी (20) या दोन भावांच्या पत्नी होत्या. आरोपींनी रुग्णवाहिकेतून मृतदेह सिमडेग्यात नेऊन पुरले, असे पोलीस सांगतात. गुमला पोलिस अधीक्षक हरीश बिन जमान यांच्या माहितीनुसार आरोपींनी चौकशीत गुन्हा कबूल केला.