टॅग
हरिद्वारहून कर्णप्रयागकडे जाणारी प्रवासी बस मंगळवारी पहाटे ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर गुलर बाजारजवळ पुलावरून सुमारे १०० मीटर खाली कोसळली. अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २६ जण जखमी झाले. एसडीआरएफच्या ब्यासी आणि ढालवाला पथकांनी डोंगरउतारावरून जखमींना स्ट्रेचरवर वर आणले.