#pune-metro
पिंक लाइनवर दोन नवी स्थानके आजपासून; बालेवाडीकरांना मिळणार थेट जोडणी
पुणे मेट्रोच्या पिंक लाइनवरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके बुधवारी दुपारी ३.३० वाजता प्रवाशांसाठी खुली होणार आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान प्रवास करणाऱ्यांना यामुळे दोन नवी चढ-उतरण्याची ठिकाणे मिळणार आहेत.
मेट्रोच्या कामात पिंपरीत जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया, पाचव्यांदा घटना
पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामादरम्यान महापालिकेची मोठी जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा दावा करण्यात येत आहे. मेट्रोच्या कामामुळे आतापर्यंत सुमारे पाच वेळा जलवाहिनी फुटल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
वाहतूक कोंडीतून बाहेर काढणारी 23 किमीची राइड, आणि ती चालवणार फक्त महिलाच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुणे मेट्रोच्या 23.2 किमी लांबीच्या पिंक लाइनचे उद्घाटन केले. मान-हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग सार्वजनिक-खासगी भागीदारीत 8,313 कोटी रुपयांत उभारला आहे. 4 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता 23 पैकी 17 स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू होईल.