#pune
दुर्गा विसर्जनाचा शोकांत: कोटा कालव्यात नाव उलटली, दोन तरुणांचा मृत्यू, दोन बेपत्ता
कोटा येथे दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान कोटडी कालव्यात सात जणांची नाव उलटली. बुधवारी सकाळी सूरज सिंह (२२) व विकास वर्मा (२२) यांचे मृतदेह सापडले. राहुल जोशी (१८) व आशु जोशी (१९) या चुलत भावांचा शोध सुरू. तिघांनी पोहत बाहेर पडून बचाव केला.
ब्रेकिंग न्यूजराज्यात सीबीजी प्रकल्पांसाठी विशेष 'टास्क फोर्स' स्थापन होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) निर्मितीला गती देण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महापालिकांचा वाहतूक व विल्हेवाटीवरील खर्च कमी करण्यासाठी क्लस्टर पद्धतीने प्रकल्प उभारण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
MPSC गैरप्रकारांच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत, तुकाराम मुंढेंकडे सचिवपद!
MPSC परीक्षांमधील गैरप्रकारांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली. समितीच्या सचिवपदी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली असून समिती ६० दिवसांत अहवाल सादर करेल.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात रणनीती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने पुण्यातील दोन्ही जागांवर विक्रमी विजयाचा संकल्प
आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत ऐतिहासिक विजयाची पताका फडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कुशल संघटनात्मक नेतृत्वाखाली आज पुणे शहर भाजपची अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.
ब्रेकिंग न्यूजशंभू शिवरायांच्या विचारांचा विश्वविक्रमी गजर; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जगभर सन्मान
पिंपरी-चिंचवड, पुणे येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 'स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण' या पुतळ्याला ४ हजार ११२ ढोल-ताशा वादकांनी सलग साडेपाच मिनिटे ढोल वाजवून मानवंदना दिली. या ऐतिहासिक कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

रोहित पवारांच्या स्टंटबाजीकडे खुद्द शरद पवार साहेबांनी पाठ फिरवली : आमदार चित्रा वाघ
विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा राजकीय वापर करणाऱ्यांना चित्राताई वाघ यांचा चांगलाच दणका
ब्रेकिंग न्यूजMPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख १२ मागण्या आणि मा. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर झालेली परिपूर्ती
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, गुणांमधील तफावत, निवड प्रक्रियेतील अनियमितता तसेच पेपरफुटी प्रकरण या मुद्द्यांवर आंदोलन करत प्रमुख १२ मागण्या मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व परीक्षार्थी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.



