टॅग
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या तपासात पुणे-मुंबईतून १२ हजारांहून अधिक भारतीय सिम कार्डे दुबईला पोहोचवल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच आठवड्यांत सात जणांना अटक झाली आहे. निगडीच्या आरोपीला इंटरपोलच्या मदतीने भारतात आणण्यात आले. ग्राहकांच्या नकळत कार्डे बनवून ती पुढे पाठवली जात होती.