#pcmc
पाणी न देणाऱ्या भागात बांधकामाला परवानगी नको; विभागीय आयुक्तांचे आदेश
पाणीपुरवठ्याची हमी देऊ शकत नसलेल्या भागांतील बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी सुमारे २५० गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्यासमोर केली. त्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएकडे कारवाई अहवाल मागवले.
निगडी केंद्र बंद; पिंपरी-चिंचवडला २६ नोव्हेंबरला पाणी नाही
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल-दुरुस्तीची कामं होणार असल्याने गुरुवारी २६ नोव्हेंबरला या केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. त्यानंतर काही दिवस पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता.
नऊ महिन्यांनंतर भाजपचे सात स्वीकृत नगरसेवक जाहीर; पिंपरीत मेयर लांडगेंची घोषणा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नऊ महिन्यांच्या दिरंगाईनंतर भाजपनं आपल्या सात स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली. मेयर रवी लांडगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत नावे जाहीर केली. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीनं तीन जागांसाठी माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्यासह तीन नावे निश्चित केली आहेत.