टॅग
उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथील औषध दुकानदाराकडून 25 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दोन उपनिरीक्षकांना अटक केली आहे. अजित सिंग मीना आणि सुमित कुमार अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी दिल्लीत सापळा रचण्यात आला. रविवारी सीबीआयने दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली.