टॅग
मुंबई महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या कार्यालयांना गुरुवारी बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ईमेल आले. धमकीत अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर ड्रोन हल्ल्याचा उल्लेख होता. नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय सुमारे तीन तास रिकामे करण्यात आले, काहीही संशयास्पद आढळले नाही. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयालाही गुरुवारी धमकीचा ईमेल मिळाला.