टॅग
18 ऑक्टोबरला टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबारातील 11 वा आरोपी म्हणून मुंबई पोलिसांनी इंदोरच्या 22 वर्षांच्या प्रांजल ठकराल याला ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने सोमवारी दोन महिलांसह चार आरोपींची पोलीस कोठडी 28 ऑक्टोबरपर्यंत वाढवली. सुरुवातीला आमिर खान, तर त्याआधी सलमान खान यांना लक्ष्य करण्याची योजना होती, असे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.