#mpsc
MPSC गैरप्रकारांच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत, तुकाराम मुंढेंकडे सचिवपद!
MPSC परीक्षांमधील गैरप्रकारांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली. समितीच्या सचिवपदी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली असून समिती ६० दिवसांत अहवाल सादर करेल.
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचे रोहित पवारांना खुले आव्हान
पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला आता तीव्र वैयक्तिक आणि राजकीय वळण लागले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार आणि आंदोलनकर्ते विवेकानंद पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बन यांनी या दोन्ही नेत्यांना भारतीय परंपरा, धर्मशास्त्र आणि संस्कृतीवरील आपले ज्ञान सिद्ध करण्याचे थेट आव्हान दिले आहे.

MPSC पेपर लीक प्रकरण: अध्यक्ष आणि सदस्यांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी समितीची शिफारस केली
परीक्षेचे पेपर लीक आणि गैरप्रकारांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माजी आणि विद्यमान अध्यक्षांच्या तसेच सदस्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

रोहित पवारांच्या स्टंटबाजीकडे खुद्द शरद पवार साहेबांनी पाठ फिरवली : आमदार चित्रा वाघ
विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा राजकीय वापर करणाऱ्यांना चित्राताई वाघ यांचा चांगलाच दणका
ब्रेकिंग न्यूजMPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख १२ मागण्या आणि मा. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर झालेली परिपूर्ती
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, गुणांमधील तफावत, निवड प्रक्रियेतील अनियमितता तसेच पेपरफुटी प्रकरण या मुद्द्यांवर आंदोलन करत प्रमुख १२ मागण्या मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व परीक्षार्थी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.


