#marathi
इन्फोसिसचा नफा 7,823 कोटींवर; वार्षिक उत्पन्नाचा अंदाज कमी
इन्फोसिसने सप्टेंबर तिमाहीत 7,823 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, जो वर्षभरात 6.2 टक्क्यांनी वाढला. उत्पन्न 49,244 कोटींवर गेले. कंपनीने 2026-27 साठी उत्पन्न वाढीचा अंदाज 1 ते 2 टक्क्यांवर आणला.
विशाखापट्टणममधील गूगलचे 15 अब्ज डॉलरचे एआय हब, मराठीसह भारतीय भाषांच्या साधनांना बळ
विशाखापट्टणममध्ये गूगलचे प्रस्तावित 15 अब्ज डॉलरचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब देशभरातील एआयचा वापर वाढवेल; आरोग्य तपासणीपासून भारतीय भाषांच्या साधनांपर्यंत. हे हब कंपनीच्या स्वतःच्या सेवांसाठी आणि बाहेरील क्लाउड ग्राहकांसाठीही उभारले जात आहे, असे गूगलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पहिला टप्पा 2028 मध्ये सुरू होईल.
ब्रेकिंग न्यूज“माझ्या महाराष्ट्राच्या डोळ्यांतील दुष्काळाचे पाणी पुसायचेच!”: राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार
वर्षानुवर्षे कोरड्या पडणाऱ्या जमिनी, पाण्यासाठी मैलोन्मैल भटकणाऱ्या मायमाऊल्या आणि आकाशाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा... महाराष्ट्राच्या नशिबी आलेला हा दुष्काळाचा शाप आता कायमचा पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.
