टॅग
पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने विक्रमगड तालुक्यातील भोपोली गावातील बंगल्यात सुरू असलेले कथित बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त केले. सात जणांना अटक झाली आहे. आरोपींनी अमेरिकन नागरिकांना बनावट व्हायरस इशारे पाठवून गिफ्ट कार्ड खरेदी करायला पटवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मनोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.