टॅग
त्रिपुरातील १६ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आज सकाळी ७ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान सुरू आहे. यात ५१ प्रभागांची अगरतळा महानगरपालिकाही आहे. ५.५६ लाख मतदार २६८ जागांसाठी ७३३ उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी कैलासहर, कुमारघाट, पनिसागर आणि सबरूममध्ये बोगस मतदानाचा आरोप केला; मुख्यमंत्री माणिक साहा यांनी मतदान शांततेत सुरू असल्याचं सांगितलं.