#maharashtra-winter-session
समान कायद्यावर १५ डिसेंबरपर्यंत मते मागवली; हिवाळी अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न
समान नागरी कायद्यावर (यूसीसी) नागरिकांनी १५ डिसेंबरपर्यंत आपली मते कळवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा आणण्याची सरकारची इच्छा असून प्रथम सर्वांचे एकमत घेण्याचा प्रयत्न होईल, असे ते म्हणाले.
परीक्षेत गैरप्रकारांविरुद्ध कडक कायदा याच अधिवेशनात, फडणवीसांची घोषणा
परीक्षेतील गैरप्रकारांविरुद्ध अधिक कडक कायदा याच हिवाळी अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राधिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल दिला असून परीक्षाशुल्क परत करण्याची शिफारस केली आहे.