#maharashtra-assembly-election
विधान परिषदेच्या 28 जागांसाठी आज मतदान, उत्तर प्रदेशात भाजपा-समाजवादी आमना-सामना
उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विधान परिषदांच्या 28 जागांसाठी शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतदान सुरू झाले. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील हे मतदान संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालेल. मतपत्रिकेद्वारे मतदान होत असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात रणनीती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने पुण्यातील दोन्ही जागांवर विक्रमी विजयाचा संकल्प
आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत ऐतिहासिक विजयाची पताका फडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कुशल संघटनात्मक नेतृत्वाखाली आज पुणे शहर भाजपची अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.