टॅग
पुणे महानगरपालिकेच्या 'भाऊ फ्लेक्स काढा' पोर्टलवर मंगळवारी पहिल्याच दिवशी १६२ तक्रारी आल्या. त्यापैकी १५१ फ्लेक्सवर कारवाई झाली. नागर रोड, कोथरूड आणि कसबा येथे प्रत्येकी २१ तक्रारींवर कारवाई झाली. धनकवडी येथे एकाही तक्रारीवर कारवाई झालेली नाही. तक्रारदारांची ओळख गुप्त ठेवली जाते, असे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी सांगितले.