टॅग
दहशतवादाला निधीपुरवठा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी श्रीनगर आणि बारामुल्ला येथे १३ ठिकाणी छापे टाकले. कार्यकर्त्या खुर्रम परवेझ आणि त्यांच्याशी संबंधित संस्थांच्या नातेवाइकांच्या व सहकाऱ्यांच्या निवासस्थानांचा यात समावेश आहे. या प्रकरणात ईडीने यापूर्वी २१ कोटींहून अधिक मूल्याची मालमत्ता जप्त केली आहे.