टॅग
मुंबई पोलिसांनी 4 ते 9 नोव्हेंबर दरम्यान फटाक्यांची कथित बेकायदा विक्री, साठवणूक, प्रदर्शन आणि वाहतूक याप्रकरणी 27 गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस आयुक्तांचा प्रतिबंधात्मक आदेश 3 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत लागू आहे. याबरोबरच सार्वजनिक रस्त्यांवर फटाके उडवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल 40 हून अधिक जणांविरुद्ध 29 गुन्हे दाखल झाले आहेत.