टॅग
मंगळवारी रात्री पंढरपूर तालुक्यातील इसबावी येथे शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांची गोळ्या घालून हत्या झाली. जेवणानंतर घरासमोर शतपावली करत असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भिंगे यांच्यावर यापूर्वी हत्या आणि इतर गुन्ह्यांची नोंद होती.