#godavari-pollution
गोदावरी प्रदूषण प्रकरणात राज्याचे बॉम्बे उच्च न्यायालयात शपथपत्र; नऊ एसटीपीचे काम जुलै 2027 पर्यंत पूर्ण करणार
नाशिकमधल्या नऊ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे (एसटीपी) नूतनीकरण जुलै 2027 पर्यंत पूर्ण करणार, असे राज्य सरकारने बॉम्बे उच्च न्यायालयाला सांगितले. एकूण क्षमता 342.5 दशलक्ष लिटर प्रतिदिन. 2010 पासून संबंधित पदांवर काम केलेल्या सुमारे 197 अधिकाऱ्यांची माहितीही न्यायालयात सादर. पुढील सुनावणी 11 डिसेंबरला.
६६ इलेक्ट्रोप्लेटिंग उद्योगांवर कारवाई; अंबड-सातपूरमधील पाच बोअरवेलमध्ये क्रोमियम
नाशिकच्या अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील ६६ इलेक्ट्रोप्लेटिंग उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे. १४३ उद्योगांच्या तपासणीनंतर ही कारवाई झाली. दहा बोअरवेलच्या नमुन्यांपैकी पाचमध्ये क्रोमियम आढळले आहे.