#fii
बँक निफ्टी पहिल्यांदाच ६५,०००च्या पार, मग बाजाराने सगळं परत दिलं
सेन्सेक्स मजबूत सुरुवात करून ८४,६६२.९६ पर्यंत गेला आणि नंतर ९२१.७१ अंकांनी घसरून दुपारी १२.०९ वाजता ८२,९९८ वर आला. घसरणीत धातू आणि बँक समभाग आघाडीवर होते. बँक निफ्टीने सुरुवातीच्या व्यवहारात ६५,०००च्या वर विक्रम केला, मग सुमारे १,००० अंकांनी घसरला.
सेन्सेक्स 1,225 अंकांनी उसळला; चार सत्रांत 5 टक्के वाढ, गुंतवणूकदारांची संपत्ती 4.74 लाख कोटींनी वाढली
मंगळवारी सेन्सेक्स 1,225.07 अंकांनी वधारून 76,917.85 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 370.05 अंकांनी वाढून 23,810.85 अंकांवर स्थिरावला. सलग चौथ्या सत्रात तेजी कायम राहिली. कच्च्या तेलाचे दर घसरल्याने आणि परदेशी गुंतवणूकदार पुन्हा खरेदीला लागल्याने बाजाराला बळ मिळाले.
कच्च्या तेलाचा दणका : सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला, निफ्टी 22,500 खाली
पश्चिम आशियातील तणावामुळे ब्रेंट कच्चे तेल 113-114 डॉलरच्या पाच महिन्यांतील उच्चांकावर गेल्याने शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स 450 अंकांनी तर निफ्टी 22,500 खाली आला. मात्र आयटी शेअर्सनी तेजी दाखवली.